HomeनांदेडWater Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून...

Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

२० कर्मचाऱ्यांची दोन शिफ्ट मध्ये ड्युटी
६ कर्मचारी फिरतीवर, पाणी चोरीवरआळा
आ चिखलीकर यांनी दिल्या होत्या सूचना
लोहा। शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या सुनेगाव तलावाने तळ गाठला होता..अजून दीड महिना उन्हाळा बाकी आहेब.असा स्थित शहराला भीषण पाणी टंचाई भासणार अशी परिस्थिती निर्माण झाली . लिंबोटी धरणातून नदीपात्रा द्वारे सुनेगाव तलावात दीड टीएमसी पाणी सोडण्यात आले असून पाणी अन्यत्र वळवू नये यासाठी नगर पालिकेचे २० कर्मचारी पाणी मार्गावर बंदोबस्तासाठी कार्यरत असून, सहा कर्मचाऱ्यांना फिरतीवर ठेवण्यात आले आहे .नगर परिषदेच्या प्रशासक उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी पाणी सोडण्यासाठी पत्रव्यवहार केला तर रखरखत्या उन्हात मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी स्वतः पाहणी केली.

IMG 20250423 WA0004 Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

सुनेगाव तलावातून शहराला पाणी पुरवठा होतो .या तलावात लगतच्या नऊ गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांच्या विहिरी आहेत तसेच हिवाळ्यात रब्बी हंगामात तलावातून पाणीपाळी देण्यात आली होती त्यामुळे पाणी समस्या उदभवली.

पाणी टंचाई आराखडा बैठकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरासाठी पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला सांगितले होते तरसेचब लिंबोटी धरणातून लोहा शहरासाठी आरक्षित असलेले पाणी सोडण्यात यावे यासाठी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांनी पत्रव्यवहार केला .तसेच पाणी सोडणे कसे आवश्यक आहे हे अवगत केले.

IMG 20250423 WA0006 Water Problem Loha ; लोहा वासीयांच्या पाण्याचा प्रश्न मिटला ; लिंबोटी धरणातून कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात सुनेगाव तलावात पाणी

लिंबोटी धरणातून नदीपात्राद्वारे तलावात पाणी
शहराला पाणी समस्या उदभवू नये यासाठी मागील वर्षी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार व तत्कालीन मुख्याधिकारी तहसीलदार परळीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे विनंती केली. धरणात अत्यल्प पाणीसाठा होता असा काळात अंत्यत महत्वाच्या क्षणी तलावात पाणी सोडले .यंदा धरणात पाणी मुबलक आहे.सोमवारी (२१ एप्रिल,) धरणातून पाणी नदी पात्रात सोडण्यात आले ते पाणी १८ किमी अंतर कापून रात्री तलावात आले आहे.

रखरखत्या उन्हात मुख्याधिकारी’ साईडवर
एकीकडे शहरातील नागरिक नळाला पाणी आल्या नंतर त्याची बचत करण्या ऐवजी नासाडी अधिकची करत असतात .तर दुसरीकडे शहरवासीयांनी भीषण पाणी टंचाई भासू नये यासाठी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी येणाऱ्या पाणी मार्गावर कर्मचारी तैनात केले आहेत स्वतः रखरखत्या उन्हाची पर्वा न करता मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.

२० कर्मचारी दोन पाळीत ड्युटीवर ; सहा जण फिरतीवर
लिंबोटी धरणातून नदी पत्रात पाणी सोडण्यात आले. ३२ ठिकाणी वॉव्ह आहेत .तेथे शेतकरी रात्री वॉव्ह फिरून घेतात पाणी चोरी टाळण्यासाठी २० कर्मचारी दोन पाळीत बंदोबस्तासाठी आहेत तर सहा जण फिरते ड्युटी करत आहेत त्यामुळे पाण्याची चोटीवर आळा बसला आहे. एकीकडे पाणी टंचाई भासू नये म्हणून नगर पालिका प्रशासन प्रयत्नशील आहेत.” उन्हातान्हाची पर्वा न करता ड्युटी करत आहेत असा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय शहरवासीयांनी टाळला पाहिजे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments