Nanded ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था निवडणूक, सर्वमान्य आदर्श विकास पॅनल प्रचारात आघाडीवर

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक13 जागेसाठी साठी सर्व मान्य आदर्श विकास पॅनल उमेदवार यांनी ‌ प्रचारात आघाडी घेतली असून 8 एप्रिल रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सभासदांशी प्रत्यक्ष भेट घेऊन पॅनलने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली असून यावेळी अनेक सभासदांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे.

नावा मनपाच्या कर्मचारी पतसंस्थेची निवडणुक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 दरम्यान मनपा‌ शाळा क्रमांक 1 वजिराबाद नांदेड येथे होणार असुन मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार आहे.नावा मनपा कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 घोषीत झाल्या नंतर 13 जागेसाठी 27 ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

सर्वमान्य आदर्श विकास पॅनल माजी अध्यक्ष कै.तानाजी कानोटे, माजी अध्यक्ष दयानंद गायकवाड, पुरस्कृत पॅनल व पॅनल प्रमुख गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण गटातील ऊमेदवार कानोटे शाम गंगाराम, कोल्हापूरे‌ सतपाल सिंघ रणजितसिंघ ,जमील अहेमद म.वजिर,जाधव रणजित नारायण,जौधंळे साहेबराव विठ्ठलराव‌ बनसोडे सुमेध भगवान,स.जाकेर अली मेहमूद अली सयद, सोनकांबळे विशाल‌ बालाजी, अनुसूचित जाती जमाती राखीव वंदने‌ दिलीप वामनराव,महिला राखीव घुले‌ आशाबाई सुग्रिव,पतेवार‌ निर्मला पोतन्ना,भटक्या विमुक्त जाती जमाती नागरगोजे गणेश वामनराव‌, ईतर मागासवर्गीय राखीव स्वामी ओंकार दिगंबर हे ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत निशाणी कपबशी यावर मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत जवळपास साठ सभासद असुन 8 एप्रिल रोजी सर्वमान्य आदर्श विकास पॅनलच्या उमेदवार यांनी भेट घेऊन सुसंवाद साधला असून सभासद मतदार यांनी प्रतिसाद दिला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button