किनवट, परमेश्वर पेशवे| आज दिनांक ईस्लापुर पासून जवळचं असलेल्या नंदगाव येथ निखिल वागमरे जगदीश हनवते गौरव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली.


या शाखेचे उद्घाटन वंचितचे किनवट तालुका अध्यक्ष निखिल वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाखा अध्यक्ष म्हणून संदीप लव्हाळे, उपाध्यक्ष चांगदेव भडंगे/यशवंतराव टारपे, सचिव देविदास भडंगे, सहसचिव दत्तात्रय डुकरे, कोषाध्यक्ष सोमनाथ टारपे , संघटक लक्ष्मण लव्हाळे, सहसंघटक शिवाजी टारपे आणि सल्लागार विशाल लव्हाळे आदींची निवड करण्यात आली.


या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण दादा गायकवाड , दिनेश कांबळे ,खंडेराय कांबळे, भारत लव्हाळे, बाबू भंडगे, प्रकाश भडंगे, विनोदबोड्डेवार,परमेश्वर गायकवाड, शंक बोड्डेवार यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते




