हदगाव| कलकत्ता येथील आरजीकार हास्पीटल मध्ये 9आँगष्ट रोजी एका महीला डाँक्टरवर आमणुष अत्याचार बलत्कार नंतर खून करणा-या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अशी मागाणी डाँक्टर आसोशिएनने एका निवेदन द्वारे केली आहे.


त्यांनी दि 17 आँगष्टच्या दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे की, या गुन्हातिल आरोपीना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी. तसेच आरोपीना मदत करणा-या इतर सहका-याना इ. आरोपीसह त्वरीत अटक व्हावी. डाँक्टरवर भविष्यात अश्या गंभीर घटना घडु नये. पोलीसानी त्वरीत नियोजन करावे. सरकारी रुग्णालय मध्ये सीसी कँमरे बसविण्यात यावे. खाजगी रुगाणालय कार्यरत असणा-या कुणी डाँक्टर सोबत असभ्य वर्तन करत असेल तर स्थानिय पोलिस स्टेशनद्वारे तात्काळ मदत मिळावी इ मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर डाँक्टर असोशिएनचे अध्यक्ष सह खाजगी डाँक्टराच्या सह्या आहेत.




