श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई व मालवाडा शिवारात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरूम उत्खनन झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर तहसील प्रशासनाणे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले असता, सदर उत्खनन पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट निष्पन्न झाले आहे.तसा अहवाल ही तलाठी यांनी तहसीलदार यांना दिला आहे मात्र कार्यवाही चे बिराड ईटीएस (रोव्हर) मोजणीच्या फेऱ्यात अडकले आहे.


मालवाडा शिवार गट क्र. ६३ मधील सरकारी गायरान जमिनीतूनही परवानगीशिवाय मुरूम उत्खनन सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्पष्ट झाले आहे.तर रुई येथील गट क्र,५७ मधून ३०० ब्रॉस रॉयल्टी वर दोन पोकलंड च्या सह्हयाने उत्खनन करून १२ हायवा ने दिवस रात्र वाहतूक करण्यात आली आहे.याची सचित्र तक्रार असून ही महसूल प्रशासन या कडे गांभीर्याने घेत नसल्याने गुत्तेदारास मुभा मिळत आहे.


दोन्ही प्रकरणात तहसीलदारांनी महसूल अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.त्या नंतर भूमी अभिलेख कार्यालयात इटीएस मोजणीचे पत्र सुद्धा दिले मात्र अद्याप कुठलीही मोजणी झालेली नाही.परिणामी हे प्रकरण अधिकच किचकट बनले आहे. या बेकायदेशीर उत्खननामुळे शासन महसूलाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही उत्खनन सुरू राहिल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, जबाबदारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.यापुढे अशा अनधिकृत उत्खननावर अंकुश बसतो का, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.




