नांदेड| महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे(फेस्काॅमचे)नव निर्वाचित अध्यक्ष मा.आण्णासाहेब टेकाळे यांच्या सुचणे प्रमाणे फेस्कामच्या स्थापणा दिनाचे औचित्य साधून उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम,रोटरी क्लब नांदेड, अपेक्षा हाॅस्पिटल, सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ, वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, वनिता विकास महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कान,नाक,घसा आरोग्य तपासणी तथा मोति बिंदू तपासणी व शस्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ नागरिकांनी शिबिरास उदंड प्रतिसाद दिला. नेत्र (मोतीबिंदू) तपासनी शिबिरात 107 तर आरोग्य तपासनी व रक्ताताली साखरेचे प्रमाण तपासनी या दोन्ही शिबिरात मिळून तब्बल 507 शिबिरार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
“अपेक्षा हाॅस्पिटल” मधील व लाॅयन्स नेत्रालयातील तज्ञ डाॅक्टर चमूनी खास ज्येष्ठ नागरिकां साठी विनामुल्य विशेष सेवा दिली. .शिबिर यशश्वि करण्यासाठी विशेषकरून प्रभाकर राव कुंटूरकर,गिरिष बार्हाळे,सौ.व श्री विलास शिराढोणकर,जनाबाई पोपूलवार,बी.एन कुंटूरकर, सौ.नंदाताई पाटीलअदि तसेच सहयोगी संस्था संचालक,पदाधीकारी, सदस्य, तसेच वैद्य व अपेक्षा रूग्णाल यातील डाॅक्टर्स, परिचारिका, सहायक कर्मचार्यांनी मोलाची कामगीरी केले!