हिमायतनगर| तालुक्यातील पैनगंगा नदीच्यय पात्रातून छोटया पद्धतीने वाहतूक करून जाडा दराने विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वारंगटाकळी ते हिमायतनगर येणारे रोडवर धानोरा गावात जाणारे रोडचे चौकात हिमायतनगर पोलिसांनी वाह जप्त करून पोलीस कार्यवाही केली आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेडlश्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे,, सपोउपनि.अरविंद राठोड, पोहेका. मेंडके, पोहेका. नागरगोजे आदींनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफीया कडुन अवैद्य मार्गाने बाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात असल्याने अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी अवैद्य वाळू उपसा व वाहतुक संदर्भाने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. 09/02/2025 रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असतांना गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळाली किं, वारंगटाकळी कडुन रोडने एक महिन्द्रा कंपनिचा लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळुने भरून चोरटी वाहतुक करीत हिमायतनगरकडे येत आहे.

त्यांमुळे पोलिसांचे पथक थांबले असता सकाळी वेळ 04.20 वाजता एका लाल रंगाचा ट्रॅक्टर महिन्द्रा कंपनिचा वारंगटाकळी रोडने आला. सदर ट्रॅक्टरला थांबवुन वाहन तपासले असता त्याच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे दोन ब्रास वाळु भरलेली दिसुन आली. म्हणुन नमुद आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात एक लाल रंगाचा ट्रॅक्टर वाळुने भरलेल्या ट्रॉलीसह कि. अं.3,50,000/- रु.) व अंदाजे दोन ब्रास वाळु कि.अं. 10,000/- रु. अशी एकूण 3,60,000/-रु. ची मालमत्ता जप्त करण्यात आली.

पो.स्टे. हिमायतनगरचे अंमलदार पोहेकॉ. मेंडके यांचे फिर्याद वरुन आरोपी ज्ञानेश्वर शेषेराव शिंदे वय 23 वर्षे रा. बोरगडी, विश्वानंर कानवटे रा. वारंगटाकळी ता. हिमायतनगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिट पोहेकॉ. सुरकंटे हे करीत आहेत. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.