sand theft : हिमायतनगर पोलिसांनी वाळु चोरी उघडकीस आणली; 3 लक्ष 60 हजाराची मालमत्ता हस्तगत
हिमायतनगर| तालुक्यातील पैनगंगा नदीच्यय पात्रातून छोटया पद्धतीने वाहतूक करून जाडा दराने विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वारंगटाकळी ते हिमायतनगर येणारे रोडवर धानोरा गावात जाणारे रोडचे चौकात हिमायतनगर पोलिसांनी वाह जप्त करून पोलीस कार्यवाही केली आहे.
हि कार्यवाही अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड, खंडेराय धरणे (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, भोकर, सूरज गुरव (म.पो.से.), अप्पर पोलीस अधिक्षक, नांदेडlश्रीमती. शफकत अमना (भा.पो.से.), उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भोकर यांचे मार्गदर्शनाखाली अमोल भगत, पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे,, सपोउपनि.अरविंद राठोड, पोहेका. मेंडके, पोहेका. नागरगोजे आदींनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यामध्ये वाळु माफीया कडुन अवैद्य मार्गाने बाळु उपसा व वाहतुक करुन शासनाचा लाखो रुपयाचा महसुल बुडविला जात अ...
