क्राईमनांदेड

हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

जागरूक महिलांच्या तक्रारींची पोलिसांनी घेतली गांभीर्याने दखल; दारू विक्रेता झाला फरार

हिमायतनगर। शहरासह तालुक्यातील अनेक गावागावात अवैध रित्या देशी-विदेशी दारू विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे अबाल, वृद्ध नागरिक दारूच्या आहारी जाऊन आपले आयुश्य बरबाद करून घेत आहेत. त्यामुळे जागरूक महिला मंडळी कडून हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन अवैद्य दारू विक्री थांबवा आणि आमचे उघड्यावर येणारे संसार वाचवा, अन्यथा आम्हालाच धडक मोहीम उघडावी लागेल असा इशारा दिला होता. याची हिमायतनगर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन अवैध दारू विक्रेत्यावरील कार्यवाहीची धडक मोहीम उघडली आहे. आज दि.17 जून रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम, इंदिरानगर आबादि येथे एका किराणा दुकानावर छापा टाकून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करून पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही केली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचे महिलांनी अभिनंदन करून अशाच प्रकारचा दबदबा गावातील इतर दारू विक्रेत्यावर कार्यवाही करून अवैध दारू विक्री हद्दपार करावी अशी मागणी केली आहे.

याबाबत सवसितर वृत्त असे कि, हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील गावागावात मोठ्या प्रमाणात अवैद्य देशी – विदेशी दारूसह आता नशिली शिंदीची केली जात आहे. याबाबत अनेक गावातून महिला मंडळींसह व्यसनमुक्तीचे प्रचारकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. नुकतेच हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम बु.येथील महिला मंडळींनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार करून विना परवाना कोणतेही दारू विक्रीचे लायसन्स नसताना देशी व विदेशी दारू, किराणा दुकान, पानपट्टी आदींसह अन्य व्यवसायाच्या असून हा अवैद्य दारू विक्रीचा गोरखधंदा चालविला जात आहे. हि बाब महिलांनी हिमायनगर पोलिसांना तक्रार देऊन सांगितली. या दारूमुळे आमचे संसार देशोधडीला लागत आहेत.. युवा पिढी व्यसनाधीन होऊन दारूच्या आहारी गेली आहेत, यवत तात्काळ अंकुश लावून गावात विक्री करणाऱ्या आठ ते दहा विक्रेत्यांवर कार्यवाही करून आमचे संसार वाचावा अशी मागणी केली होती.

IMG 20240617 114457 हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त - NNL

त्या मागणीला गांभीर्याने घेत पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांनी माहिती घेतली, महिला शक्तीने दिलेल्या गुप्त माहितीवरून आज सकाळी पोलिसांनी सरसम इंदिरानगर आबादी येथील एका किराणा दुकानावर छापा टाकून मोठा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. यामध्ये पोलिसांनी देशी दारू भिंगरी ११ हजार ६२० रुपये, मैक्डोवेल ११ हजार २५० रुपये, आय बी ४ हजार ६२० रुपये, आर एस २ हजार ७०० रुपये असा एकूण ३० हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हि कार्यवाही पोलीस जमादार अशोक सिंगणवाड, जमादार सुधाकर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या कार्यवाही नांतर अवैद्य दारू विक्रेत्याच्या खळबळ उडाली असून, कार्यवाहीच्या भीतीने अनेकांनी गाशा गुंडाळला आहे. असे असले तरी दोन बंद राहून पुन्हा वैद्य दारू विक्रीचा धंदा सुरु होऊ नये यासाठी गावातील सर्व दारू किक्रेत्यावर कार्यवाही करून पोलिसांनी आपला दबदबा कायम ठेवावा अशी मागणी महिलांनी केली आहे.

याबाबत अशोक सिंगणवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 65 ई महाराष्ट्र प्रॉव्हिशन कायद्यानुसार विनापरवाना अवैद्य रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने देशी विदेशी दारू साठा बाळगल्या प्रकरणी किरण कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारूच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या सरसम येथील रणरागिणी महिलांनी सांगितले की, हा सर्व प्रकार गावातील पोलीस पाटील यांच्याशी मिलीभगत करून अल्पवधीत मालामाल होऊ पाहणारे आठ ते दहा विक्रेते जण करत आहेत. अनेक जण किराणा दुकान, पान टपरी यासह अन्य दुकानाच्या आडून हा गोरख धंदा करत असून मोठ्या बियर बार मध्ये नसलेले सुविधा या ठिकाणी दारुड्यांना देतात. त्यामुळे दहा रुपयापासून देशी विदेशी दारू मोजमापानुसार विकली जाते. त्यामुळे दारू विक्रेत्यांना जरब घालून गावातून कायमची दारू बंद करावी अशी मागणी पत्रकारांशी बोलताना महिलांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!