नांदेड| डाक विभागाच्या भुसावळ रेल्वे मेल सर्व्हिसचे सॉर्टींग असिस्टंट हरी ठोंबरे यांची नुकतीच भुसावळ येथून नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. हरी ठोंबरे यांनी भुसावळ येथून डाक विभागाच्या रेल्वे मेल सर्व्हिसला मुंबई, पुणे, गोवा, सुरत, ईतर ठिकाणी आपली सेक्शन सेवा बजावली.


गेल्या चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी कर्मचारी यांच्या सह अनेका सोबत अतिशय मैत्री, आदर, प्रेमळ भावना व उत्कृष्ठ सेवा दिल्यामुळे अनेकांच्या मनात ठोंबरे यांनी आगळे वेगळे नाते निर्माण केले आहे .त्यांची नांदेड आरएमएस येथे बदली होताच ( ता 27) रोजी हरी ठोंबरे यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला.


त्यामुळे नांदेड आरएमएसचे एस आर ओ श्री एम जी पाटोळे यांनी हरी ठोंबरे यांचे पुष्पगुछ देऊन वेलकम स्वागत केले. यावेळी जी बी कदम,एस के कवटकर,बी बी चिवडे,सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.हरी ठोंबरे नांदेड आरएमएसला रुजू झाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होता आहे.




