हिमायतनगर, अनिल मादसवार| तेलंगणा राज्यातून हिमायतनगर शहरात तालुक्यातील जंगलातील चोरीच्या रस्त्याने आणण्यात येत असलेल्या गुटख्याच्या मुद्देमालासह बोलेरो गाडी हिमायतनगर पोलीसांनी पकडली असून, पळून जाणाऱ्या आरोपींना पोलीसांनी पाठलाग करत ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई दिनांक १६ रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे अवैध्य धंदे करणाऱ्या गुटखा माफ़ियामध्ये खळबळ उडाली असून, एका माफियाव पोलिसांनी कार्यवाही केली असताना अन्य गुटखा माफियांवर काढू कार्यवाही होणार असा प्रश्न शहरातील जनतेतून विचारला जात आहे.
हिमायतनगर शहर हे गुटख्यासाठी प्रसिद्ध शहर झाले असून, महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेला गुटखा चोरट्या मार्गाने आणून तो गुटखा विदर्भातील अनेक सर्कल, गावात पाठविण्यात येऊन गुटखा माफिया अल्पावधीत मालामाल होत आहेत. तेलंगणा टू हिमायतनगर हा रूट गुटखा माफियासह, रेशन, गोतस्करी, यासह विविद्य अवैद्य धंद्यासाठी प्रसिद्ध आहे. सध्या निवडणुकीची धामधूम सुरु असून, वाशी चेकपोस्टवर बंदोबस्त लावण्यात आल्यानंतर आता शहरात गुटखा आयात करताना दस्तगिरवाडी, पवना मार्गे असलेला तेलंगणात जाणाऱ्या चोर मार्गाचा वापर केला जात आहे.
हिमायतनगर शहर गुटख्याचे माहेरघर बनले असून, अश्याच प्रकारे दिनांक १६ च्या रात्री हिमायतनगर पोलीसांचे पथक पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन प्लॅश आउट अंतर्गत रात्रीची गस्त करत असताना तेलंगणातून पवना मार्गे हिमायतनगर शहराकडे गुटखा आयात केला जात असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे हिमायतनगर पोलिसांनी सापळा रचून तेलंगणा राज्यातून येणाऱ्या दस्तगिरवाडी, पवना मार्गे महिंद्रा बोलेरो गाडी एम. एच. २६ व्हि. ३२३५ मधून येणाऱ्या गुटख्याची गाडी पकडली. सदर गाडी मध्ये राजनिवास कंपनीच्या सहा बोऱ्यामध्ये एकूण १३५० गुटखा रुपये २ लक्ष ५९ हजार २०० रुपये आणि प्रीमियम कंपनीचा जाफरानी जर्दाच्या सात बोऱ्यामध्ये १५७५ पैकेट ७५ हजार ६०० रुपये आणि महिंद्रा बोलेरो गाडी ५ लक्ष रुपये असा एकूण ८ लक्ष ३४ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीसांनी वाहनासह पळून गेलेल्या दोन आरोपींना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. शासनाचा प्रतिनिधी पोहेकाॅ. बालाजी दादाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपी रशिदखान हैदरखान रा. हिमायतनगर व असलमभाई रा तेलंगणा यांच्या विरूद्ध संगनमत करून महाराष्ट्राने बंदी घातलेला गुटखा मसाला, सुगंधित तंबाखू या असुरक्षित आरोग्यास अपायकारक व तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा व विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून अवैध वाहतूक केली. यावरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२३, २२३, २७४, २७५, अन्नसुरक्षा, मानके अधिनियम २००६ अंतर्गत कलम २६ (२) (iv), २७ (३) (d), २७ (३) (e) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांनाही पोलीसांनी अटक करून ८ लक्ष ३४ हजार आठशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घानेच अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल भगत हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांनी अभिनंदन केले आहे.