करियरनांदेड

Police Dada-Didi : शिवछत्रपती विद्यालयात पोलीस दादा-दिदी जनजागृती मोहिमेतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहा| मोबाईल – सोशल मिडियाचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. अल्पवयीन मुले-मुली मिसिंगच्या घटनेन होणारी वाढ कौट्रेबिक दृष्ट्या चिंताजनक असून शाळकरी विद्यार्थी नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढते आहे . अशा अनेक अपवृती समाजात शालेय विद्यार्थ्यांत वाढत आहेत त्या अनुषंगाने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना कायद्यांची माहिती तसेच जनजागृती व्हावी यासाठी पोलीस दादा-पोलीस दीदी’ या उपक्रमा अंतर्गत शिवछत्रपती विद्यालयात लोहा पोलीस ठाण्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.

शिवछत्रपती विद्यालयातील नववी-दहावी वर्गातील विद्यार्थ्यांना ” पोलीस दादा-पोलीस दीदी “या मोहिमेतर्गत पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली ” जाणीव जागृती ” करण्यात आहे. मुख्याध्यापक दामोधर वडजे यांच्या अध्यक्षते खाली झाल्या या कार्यक्रमासाठी पोलीस उपनिरिक्षक संतोष पाटील, गुप्त शाखेचे प्रमुख सदाशीव जामकर प्रमुख मार्गदर्शक होते यावेळी क्रीडा शिक्षक दिलीप कहाकेकर, प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले, हरिहर धुतमल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस उपनिरिक्षक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांना ध्येय ठेवून अभ्यास करा अन्यत्र लक्ष भटकू देऊ नका असे मार्गदर्शन केले. डीएसबी प्रमुख जामदार सदाशिव जामकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. मिसिंग मुला-मुलींच्या जीवनावर होणारे दुष्परिणाम , तसेच ११२ डायल कधी करायचे. शिवाय घडणाऱ्या घटना त्याचा आई वडील कुटुंबावर होणार परिणाम याची माहिती दिली.

मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी’ या उपक्रमाची सामाजिक गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांना महत्व पटवून दिले. हरिहर धुतमल यांची प्रास्ताविक तर प्रभावी सूत्र संचलन बालाजी गवाले यांनी केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंका, प्रश्न त्याचे निराकरण पोलीस अधिकाऱ्यांनी केले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!