नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांना नवीन शासकीय वाहनांचे वितरण आज करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला.


या प्रसंगी पालकमंत्री अतुल सावे यांनी हिरवा झेंडा दाखवून सदर वाहने संबंधित तालुक्यांकडे रवाना केली. कार्यक्रमास खासदार अजित गोपछडे, खासदार रविंद्र चव्हाण, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार भिमराव केराम, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमादार आनंदराव बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख आणि संबंधित पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यावेळी उपस्थित होते.


माहूर, हदगाव, कंधार, देगलूर, बिलोली, उमरी व नायगाव या सात पंचायत समित्यांना हे वाहन देण्यात आले असून, या वाहनांच्या माध्यमातून तालुका स्तरावरील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व परिणामकारक होईल, असा विश्वास पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.



