नांदेडराजकीय

Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद… गावोगावी तुतारीचा जोर वाढला -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे| महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद मिळत असून ईस्लापूर ,शिवणी, जलधारा,अप्पारावपेठ, तोटंबा परिसरातील गावोगावी तुतारीचा जोर चांगलाच वाढल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस ,शिवसेना उबाठा, माकपा व अन्य मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार प्रदीप नाईक यांचा दि. 11 नोव्हेंबर शनिवार रोजी इस्लापुर परिसरात प्रचार दौरा व गाव भेट दौरा आयोजीत करण्यात आला होता.

या दौऱ्या प्रसंगी प्रथम त्यांनी नंदगाव, नंदगाव तांडा, रिठा तांडा, रिठा गाव परोटी गाव ,परोटी तांडा ,इरेगाव येथे भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला त्यानंतर ईस्लापूर येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन करून त्यांनी हुडी, चंद्रु नाईक तांडा ,दिपला नाईक तांडा, मानसीग नाईक तांडा, मार्लोगोंडा, गोंडेमहागाव, दुर्गानगर कंचली, चिखली या गावी भेटी देऊन मतदारांना महाविकास आघाडीच्या जाहीरनामा बाबत माहिती देत मतदारांशी संवाद साधत निवडून देण्याचे आवाहन केले. या सर्व गावांना माजी आमदार प्रदीप नाईक यांनी भेटी दिल्या असता जागोजागी डफडे, ढोल, ताशा वाजवत त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.

IMG 20241112 WA0069 Pradeep Naik : प्रदीप नाईक यांना प्रचारात उदंड प्रतिसाद... गावोगावी तुतारीचा जोर वाढला -NNL

यावेळी मतदाराचा चांगला प्रतिसाद त्यांना लाभला असून त्याच्या या प्रचार दौऱ्याने परिसरातील वाडी, तांडे,गुडा यासह विविध गावात महाविकास आघाडीचे चांगलेच वातावरण निर्माण झाले. तर परिसरात बोला राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारीचा जयघोष वाढला आहे. एकंदरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदिप नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र या परिसरात पाहावयास मिळत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!