हिमायतनगर, अनिल मादसवार| शुक्रवार पासून हिंदू सणांपैकी सर्वात मोठा पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. शहरातील परमेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र असल्याने सोमवारी दर्शनासाठी सर्व जण येतात हि बाब लक्षात घेत सर्व शाळांनी श्रावण सोमवारी दुपारची सुट्टी (Give half-day holiday) देण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर शाखा बजरंग दलाच्या वतीने एका निवेदनाद्वारे शाळा प्रशासनाला करण्यात आली आहे.


पवित्र श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांच्या सण उत्सवाची रेलचेल चालू असते. भारतीय संस्कृतीत श्रावण महिना पवित्र मानला जातो. आपल्या वाढोणा शहरात श्री परमेश्वर मंदिर तीर्थक्षेत्र आहे. मंदिरात ओम नमः शिवाय नामजाप आणि इतर धार्मिक सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साही वातावरण तयार होते आहे आणि सर्वच जण श्री परमेश्वर, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु वेळ मिळत नसल्याने अनेकांचे वृत्त अर्धवट राहून दर्शन घडत नाही.

बजरंग दलाचे (Bajrang Dal) पदाधिकारी यांच्या म्हणण्यामनुसार “श्रावण सोमवार हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक ठिकाणी विशेष पूजा-अर्चा, कावड यात्रा व महादेव मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रम होतात. विद्यार्थ्यांनाही यात सहभागी होता यावे यासाठी शाळांना अर्धी सुट्टी देणे गरजेचे आहे.” श्रावण महिन्यात सर्व सरकारी शाळांना सोमवारी दुपारची सुट्टी असते. मात्र काही शाळांना सुट्टी नसल्याने विद्यार्थ्यांच्या धार्मिक भावनां दुरावत आहेत. आजच्या तरुण पिढीला व हिंदू धर्मातील बालकांना हिंदू संस्कृतीची ओढा वाढली आहे.



हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी धार्मिक स्थळांना भेटी देऊन दर्शन घेण्यासाठी शहरातील सर्व शाळां प्रशासनाने फक्त श्रावणात सोमवारी (Shravan Monday) दुपारनंतर अर्धी सुट्टी देऊन या धार्मिक श्रावण महिन्यात हिंदू मय वातावरणात सहभागी व्हावे. तरच जागृत हिंदु, सुरक्षीत भारत घडून हिंदू संस्कृती टिकून राहील असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर बजरंगदल वाढोणा तालुका संयोजक सोपान कोळगिर, तालुका सहसंयोजक ज्ञानेश्वर लिंगमपल्ली, शिरीष गुंडेवार, देवा चर्लेवार, परमेश्वर बडवे आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


