किनवट, परमेश्वर पेशवे। जुलै महिन्यात होणाऱ्या राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळण्याच्यादृष्टीने मला संधी द्यावी,अशी मागणी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या तथा महिला मोर्चाच्या ( उत्तर) जिल्हाध्यक्षा सौ.संध्या राठोड यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलीय.. आहे.


यासंदर्भात सौ.संध्या राठोड यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी किनवट-माहूर विधानसभा (जि.नांदेड ) या बंजाराबहुल लोकसंख्या असलेल्या कार्यक्षेत्रातील रहिवाशी आहे. सध्या मी भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणीवर सदस्या म्हणून व नांदेड (उत्तर) जिल्हा भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष बांधणीसाठी व पक्ष वाढीसाठी सक्रिय कार्य करीत आहे. मी व माझे पती माजी जिल्हा परीषद सदस्य प्रफुल्ल राठोड आम्ही बंजाराबहुल विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट-माहूर विधानसभा परिसरात मागील अनेक वर्षापासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात पूर्णवेळ कार्य करीत आहोत. तसेच अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून या बंजाराबहुल किनवट-माहूर विधानसभा परिसरात शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहोत.


त्याच बरोबर राठोड घराण्याची कारकीर्द पाहिली तर सौ संध्याताई राठोड यांचे सासरे उत्तमराव राठोड तीन वेळा हिंगोली चे खासदार, चार वेळेस आमदार, एक वेळेस विधान परिषद सदस्य, माजी महसूल मंत्री, महाराष्ट्र पर्यटन विकास मंत्री मंडळ अध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात किनवट माहूर विधानसभा क्षेत्रात विकास बहुमूल्य कामे झाली आहेत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रफुल राठोड त्यांची पती होते सौ संध्या राठोड ह्या उंचशिक्षित एम ए किनवट माहूर मध्ये विविध संस्थेच्या सचिव शिक्षण सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे सरकार मोठ्या प्रमाणात लोकोपयोगी कार्य करीत आहे. तसेच केंद्रातही पुन्हा आपले सरकार विराजमान झाले आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारमध्ये आपल्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. परंतु, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना देखील जनतेची थेट सेवा करण्याची संधी मिळावी, असे मनोमन वाटते.


महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात आतापर्यंत बंजारा महिलेला लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे आपल्या पक्षाकडून ही संधी निश्चित बंजारा महिला म्हणून मला देण्यात यावी अशी अपेक्षा आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या प्रत्येक आंदोलन,उपक्रम,बैठकांत माझा सक्रिय सहभाग आहे.सन २०१९ मध्ये भाजपकडून किनवट – माहूर मतदारसंघाची निवडणूक लढवावी,असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता.भाजपला वातावरण अनुकूल असल्याने मी विधानसभा लढण्याची तयारीही केली होती.

परंतु, पक्षाने मला थांबण्यास सांगितले होते.पक्षाचा आदेश अंतिम मानून मी विद्यमान आमदारांचा प्रचार केला.बंजाराबहुल भागातील एक महिला म्हणून विधान परिषदेच्या सदस्यांची निवड करताना माझा विचार व्हावा,अशी अपेक्षा सौ.संध्या राठोड यांनी व्यक्त केली आहे. तर आज घडीला बंजारा समाजाची एकमुखी मागणी असून विधान परिषदेवर सौ संध्याताई राठोड यांची निवड केल्यास साडेचार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंजारा मतदार बंधूंचा भाजपाला नक्कीच फायदा होईल असे बंजारा समाजातून ऐकावयास मिळत आहे.


