करियरनांदेड

Genius Kids English School ; जीनियस किड्स इंग्लिश स्कूल स्कूलची स्कॉलरशिप मध्ये गगन भरारी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर l शहरातील जीनियस किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे वर्ग ५ आणि वर्ग ८ करिता घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेकरीता प्रविष्ट झाले होते.

शाळेतून वर्ग ५ स्कॉलरशिप चे शिवार्थ संदीप जाधव, विराट प्रशांत भोपळे, सोहम गजानन घोगरे, आदिप युनुस मलनस, वक्रतुंड राजाराम गंधेवाड, आरव मिलिंद कोटावर व इयत्ता ८ मधुन स्कॉलरशिपचे पार्थ सचिन कोशटवार , श्रवण चैतन्य उबाळे, अथर्व बसवेश्वर मंगनाळे, देवार्थ आशिष जयस्वाल, वैभवी दिनेश आरगुलवार, प्रज्वल रवी कासोळकर, अनुश्री पांडुरंग सोलंके, क्षितिज भाग्यवान भवरे, नियती विक्रम राठोड, श्रीपाद देवानंद जाधव, अल्मास इस्लाईम दुंगे, वेदांत चंद्रकांत रिठे, ऋषिकेश प्रमोद पिल्लेवार, आयुष संघानंद वंजारे , मिस्टी अजय जयस्वाल,असे एकूण 21 विद्यार्थी स्कॉलरशिप पात्र ठरले आहे.

स्थानिक माहूर शहरातील अल्प कालावधीतच नावा रूपाला आलेली ज़ीनियस इंग्लिश स्कूलचे पाचव्यांदा देखील आपला शैक्षणिक गुणवत्तेचा दबदबा कायम राखला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी व शाळेने कायम परंपरा राखली आहे.

माहूर तालुक्यात एकमेव जिनीयस इंग्रजी स्कूलने ” पॅशन सोबत एज्युकेशन ” हे ध्येय बाळगून तालुक्यातील विद्यार्थ्यांची सेवा करण्याचे संधी मिळाली असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष भाग्यवान भवरे यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले. नुकताच ठाणे येथे राज्यस्तरीय बेस्ट स्कूल अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. वर्षभराच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन सन्मान मिळाला आहे. याही पेक्षा पुढच्या वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप धारक करण्याचा संकल्प असल्याचा शिक्षकांनी व्यक्त केला आहे.

सर्वच स्पर्धा परीक्षेत जीनियस स्कूलचे विद्यार्थी चमकत आहेत. स्कॉलरशिप पात्र यशवंत, गुणवंत, ज्ञानवंत विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मागच्या वर्षी देखील याच शाळेची विद्यार्थिनी ईयत्ता दहावी वर्गातून तालुक्यातून प्रथम आली होती. दरवर्षी शैक्षणिक आलेख उंचावत आहे ‌.माहूर तालुक्यातून शैक्षणिक गुणवत्तेसाठी जिनीयस इंग्रजी स्कूल अव्वल ठरली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!