नांदेड| भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर जिल्ह्यातर्फे गणेश उत्सवानिमित्त भव्य देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जास्तीत जास्त गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आव्हान भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.


भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात नांदेड मध्ये भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने भव्य गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेसाठी प्रामुख्याने ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण, स्वदेशी सारखे सामाजिक विषय हाताळून मंडळातील पदाधिकाऱ्यांनी देखावे सादर करावे, प्रत्येक गणेश मंडळाने सहभागी होण्यासाठी नोंदणी फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

गणपती मंडळास भेट देऊन देखावा बघून परीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून उत्तर विधानसभेसाठी मिलिंद देशमुख, विजय येवनकर, विजय गंभीरे, अमोल कदम, शतताराका पांढरे, मारुती वाघ, सदाशिव पुरी, ज्योती कल्याणकर, क्षिरसागर शशीकांत व दक्षिण विधानसभेसाठी डॉ सचिन उमरेकर,संजय घोगरे, शितल खांडिल, वैजनाथ देशमुख, अपर्णा चितळे,संजय मोरे, प्रेम जुनी,विनोद कांचनगिरे, संजय इंगेवाड, शैलेंद्र ठाकूर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच देखावा स्पर्धेसाठी समिती गठीत केलेली असून स्पर्धेचे जिल्हा संयोजक म्हणून भाजपा प्रसिद्धीप्रमुख धीरज स्वामी व समिती सदस्य म्हणून भाजपाचे नांदेड मधील सर्व मंडळ अध्यक्ष अमित वाघ, आशिष नेरळकर, बंडू पावडे, अंबादास जोशी, आशिष ठाकूर, सचिन रावका, विश्वंभर शिंदे, सुनील राणे, भालचंद्र पवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


सदरील स्पर्धेमध्ये गणपती मंडळाचे विसर्जन मिरवणुकीपर्यंत निरीक्षण परीक्षकांकडून करण्यात येणार आहे, स्पर्धेतील विजेत्या गणेश मंडळांना रोख रकमेसह आकर्षक पारितोषिक देण्यात येईल तसेच सहभागी सर्व गणेश मंडळांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी नांदेड दक्षिण व उत्तर विधानसभेतील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी देखावा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले आहे.


