Amarnath Rajurkar : कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत – अमरनाथ राजूरकर
नांदेड| गेल्या ६३ महिन्यापासून अखंडितपणे सुरू असलेल्या धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्या कायापालट उपक्रमाची तुलना जगातील कोणासोबतही होऊ शकत नसल्यामुळे त्यांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी केले. सोमवारी ४८ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून त्यांचा कायापालट करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव हंबर्डे, ॲड. किशोर देशमुख,लायन्स उप प्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महानगर नांदेड , लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , सन्मित्र फौंडेशन, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.जेष्ठ समाजसेवक ॲड.सी. बी.दागडिया यांनी उपक्रमाची माहिती दिली.
सोमवारी सकाळी सहा वाजता स...


