HomeनांदेडTraffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती...

Traffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती अभियान

नांदेड| कायदा हा सर्वांसाठी समान असून तो जनहितासाठी असतो. त्याचे पालन करणारा प्रत्येक ऑटो रिक्षा चालक खरा कर्तव्यदक्ष चालक ठरतो, या उद्देशाने टायगर ऑटो रिक्षा चालक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वाहतूक नियम जनजागृती व रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले.

हा उपक्रम रविवारी वजीराबाद चौकात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अजय साखळे, जमादार शिंदे व माने उपस्थित होते.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ऑटो रिक्षा चालक हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून, त्यांच्या प्रतिमेत सकारात्मक बदल घडवणे आणि कायद्याबद्दल आदर निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे.

IMG 20250831 194956 Traffic rules : टायगर ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वाहातुकीचे नियम रस्ता जनजागृती अभियान
Oplus_16908288

यावेळी सर्व रिक्षाचालकांनी हातात फ्लेक्स घेऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यात वाहतूक सिग्नलचे पालन करा, गणवेश घालूनच व्यवसाय करा, आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगा, ओव्हरसीट प्रवासी घेऊ नका, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागा, झेब्रा क्रॉस व सिग्नल वापरा, चुकीच्या साईडने वाहन चालवू नका, कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करा असे संदेश देणारे फलक झळकवण्यात आले.

या प्रसंगी टायगर ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यात जिल्हाध्यक्ष शेख अहेमद, जिल्हा कोषाध्यक्ष धम्मपाल थोरात, सहसचिव गंगा सरोदे, कार्याध्यक्ष संजय शेळके, उपाध्यक्ष महमद साबेर, शेख फय्याज, शेख अन्सार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. या उपक्रमामुळे ऑटो रिक्षा चालकांमध्ये वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देत शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थेला चालना मिळाली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments