नांदेड| शहरातील खड्डेमय रस्त्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेना युवासेनेचे मनोज यादव यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन रोडवर बेशरमाची झाडे लावून गांधीगिरीच्या मार्गाने महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी आंदोलन कर्त्यानॆ हातात विविध फलक घेऊन निदर्शने केली. यावेळी भाया शर्मा, गौतम जैन, राजू यादव, शैलेशसिंह रावत, गणेश पेन्सलवार, वैष्णव महाराज, आमेर कुरेशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती. छायाचित्र करणसिंह बैस









