उस्माननगर l रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणी मधील प्रेमाचा गोडवा व कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.हा सण स्त्री आणि पुरुषांमधील ( वृक्ष,झाड ) कोणत्याही प्रकारच्या भावा बहिणींच्या नात्याचा उत्सव म्हणून सर्वत्र अनुभवायला मिळतो.


मात्र बारूळ ता.कंधार येथील वाघमारे परिवारातील सुमसांची,स्नेहल, स्वरा,मनस्वी, सानिध्या ह्या चार बहिणीनी आगळावेगळा रक्षाबंधन सण “निसर्ग माझा भाऊ” म्हणून घरच्या शेतातील झाडाला राखी बांधत निसर्ग संवर्धनाचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्याचं काम यांनी केलं आहे.


भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करतो तसेच निसर्ग आपला रक्षण करतो म्हणून निसर्गाचे रक्षण करणे हीच खरी आपली जबाबदारी आहे . असा ठाम विश्वास ह्या चार बहिणींचा आहे. सुमसांची , स्नेहल, स्वरा, मनस्वी, सानिध्या यांच्या उपक्रमातून पर्यावरण प्रेमी साठी एक प्रेरणा मिळत असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी निसर्गाशी भावनिक नातं जपण्याचा संकल्प करावा.


या कृतीतून समाजाला या चिमुकल्या मुलींना एकच सांगायचे आहे की झाडे लावा झाडे जगवा. व जस बहीण भावावर जिवापाड माया लावते त्याच प्रमाणे झाडावर माया , ममता , जिव्हाळा लावून झाडे जगवावे , असा संदेश या कृतीतून चार बहिणीने समाजापुढे आदर्श ठेवलेला आहे.



