नवीन नांदेड़| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गाडेगाव रोडवरील आलुकांदा मार्केटचा मोकळ्या जंगलात आठ जण तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने कार्यरत डिबी पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून चार जणांना अटक करून मुद्देमाल जप्त केला तर या कार्यवाही मध्ये चार जण पळुन गेले असुन एकुण नगदी व एकुण 2,22हजार 260 रुपये जप्त केला असून या प्रकरणी आठ जणा विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,अबिनाश कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने, नांदेड, यांनी, ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत खंडेराव धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर. सुरज गुरव ,अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड,सुशील कुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी विना परवाना बेकायदेशीर रित्या पैशाचे हार जितीवर जुगार खेळणारे आरोपीवर योग्यती कारवाई करण्याचे सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने पो. स्टे. पोलीस उप निरीक्षक महेश कोरे वशेख सत्तार, मारोती पचलिंग, माधव माने सर्व पो.स्टे.नांदेड ग्रा.डी.बी.टिमने गोपनीय माहितीचे आधारे पैशाचे हारजितीवर बदक छाप पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना चार आरोपीना ताब्यात घेवुन नगदी 2260/- रुपये व चार मोटार सायकल किमती 2.20,000/- रु. असे एकुण 2,22,260/- रुपयेचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर कलंदर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन कलम 12 अ महाराष्ट्र जुगार अधिनियम दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोहेकॉ केद्रे हे करीत आहेत. या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे.