हिमायतनगर। येथील काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी कॉग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजिनामा जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे सोपविला आहे.
त्यांनी दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे की, सन 2002 पासून कॉग्रेस पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. त्याच प्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदार पदावर गेली अनेक वर्ष पासून काम केले आहे. पक्षाचा प्रदेश स्तरावरुन आलेले वेगवेगळे उपकृम तालुक्यामध्ये राबवून पक्ष संघटनेसाठी पूर्ण वेळ दिला.
परंतू आज कॉंग्रेस पक्षाच काम करतांना मला विश्वासात घेतले जात नाही. त्यामूळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. असे दिलेल्या राजीनामा पत्रात म्हंटले आहे, काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाचं ते समर्थन करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.