आंतर विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत सोलापूर, नागपूर विद्यापीठाची आगे कूच -NNL 

नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बाद फेरीच्या झालेल्या सामन्यात एकेरी व दुहेरी गटात प्रतिस्पर्धी संघावर मात करून सोलापूर, नागपूर, लोणेर, जयपुर आदी. विद्यापीठाच्या संघाने विरोधी संघावर मात करून स्पर्धेत दुसऱ्या दिवशी आगे कूच केली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर संघाने जय नारायण व्यास विद्यापीठ जोधपुर संघाचा २-१ ने पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल लोणेर विद्यापीठाने जीएच रॉय सोनी विद्यापीठावर २-० ने मात केली. महाराष्ट्र ऍनिमल व फिशर सायन्स विद्यापीठ नागपूर संघाने गोवा विद्यापीठावर २-० ने विजय मिळवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने भगवंत विद्यापीठ अजमेर संघावर २-० ने सहज मात केली. 

दुपारच्या सत्रात मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठावर २-० ने विजय मिळवला. एलएनसीपीइ ग्वाल्हेर विद्यापीठाच्या संघाने महाराजा सयाजीराव बडोदा संघाचा २-०  असा एकतर्फी पराभव केला. महाराजा गंगासिंह विद्यापीठ बिकानेर संघाने एमआयटी विद्यापीठ पुणे संघावर २-० ने मात केली. सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे संघाने एचएनएनसी विद्यापीठ मुंबई संघाचा २-० ने पराभव केला. 

दि. २२ व २३ डिसेंबर रोजी बाद फेरीत विजेत्या चार संघात साखळी सामने होऊन स्पर्धेचा समारोप होणार असल्याची माहिती स्पर्धा संयोजक डॉ. महेश वाकरडकर व विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी दिली. 

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button