Homeलोहगाव येथे आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न -NNL

लोहगाव येथे आमचा गाव आमचा विकास कार्यशाळा संपन्न -NNL

नांदेड। आमचा गाव आमचा विकास , राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान जि.प नांदेड व पंचायत समिती बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतचे वर्ष 2023 -24 साठी 15 वित्त आयोग आराखडा बाबत लोहगाव , अटकळी , रामतीर्थ गागलेगाव ‘पंचायत समिती गणातील सरपंच ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा यांची कार्यशाळा लोहगाव येथे संपन्न झाली.
     
बिलोली तालुक्यातील लोहगाव – अटकळी -रामतीर्थ – गागलेगाव या गणातील सरपंच ,ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी , केंद्रप्रमुख ‘ अंगणवाडी कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक , आशा वर्कर्स यांची एक दिवसीय कार्यशाळा लोहगाव येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन गटविकास अधिकारी रवींद्र क्षीरसागर व सरपंच नम्रता कोरनूळे यांच्या उपस्थितीत पार पडले.
     
यावेळी गटविकास अधिकारी रवींद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करताना केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनांचा लाभ घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करून घ्यावा असे आवाहन केले. या कार्यशाळेला यशदा पुणे येथील प्रशिक्षक यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.         
     
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकार, बिलोली, विस्तार अधिकारी उडतेवार, नागेश चोंडे ग्रा से संघ सहसचिव , ग्रामसेवक संघटनेचे सचिव सुनील पारडे ,अनुसया आचार्य मॅडम, नरवाडे साहेब , चौडे व पंचायत समिती गणातील अंगणवाडी ताई , ग्रामरोजगार सेवक, आशा वर्कर्स व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोहगावचे ग्रामविकास अधिकारी उत्तम जाधव व ग्राम ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments