नवीन नांदेड l माजी नगरसेविका सौ. वैजयंती भिमराव गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांनी नांदेड येथे आयोजीत भाजपा संघटन पर्व या बैठकीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षांत प्रवेश केला आहे. नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधुन काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.


तर भि.ना.गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील नवीन नांदेड भागात उल्लेखनीय कार्य केले असून परिसरातील दिवाबत्ती रस्ते साफसफाई,पाण्यासह मलनिस्सारण यासह मुलभूत समस्या सोडविण्या साठी पुढाकार घेऊन अनेक समस्या सोडविले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत केलेले कार्य पहाता आगामी महानगरपालिका निवडणूक दृष्टीने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पक्षांत नांदेड येथे आयोजीत संघटन पर्व 14 फेब्रुवारी प्रवेश केला.


या वेळी महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण , नांदेड महानगर कार्यकारी अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर, भाजपा प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख माजी नगरसेविका सौ ललिता शिंदे, व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी भाजपा पक्षाची दस्ती टाकून प्रवेश दिला.


या भाजपा पक्ष प्रवेश मुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने व नवीन नांदेड भागातील राजकारणावर फरक पडणार आहे. भाजपा पक्ष प्रवेश केल्याबद्दल भाजपा पदाधिकारी मित्र परिवार व समर्थक मंडळी यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.


