नांदेड| अन्न व औषध प्रशासन कार्यालयास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक आयुक्त संजय चट्टे व सहायक आयुक्त राम भरकड यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड, ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे, अरूण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे नमुना सहायक बालाजी सोनटक्के व पोलिस स्टेशन इतवाराचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांचे पथकाने देगलूर नाका नांदेड येथे तपासणी केली.


सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० या व्यक्ती राजनिवास सुगंधीत पानमसाला, विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पानमसाला, पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला, सितार गुटखा, विविध प्रकारचे सुंगधीत तंबाखू एकूण १६ लाख २८ हजार ४९ रुपये एवढ्या किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.


जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पोलिस स्टेशन इतवारा, नांदेड यांचे ताब्यात देण्यात येवून संबंधित हजर व्यक्ती सयद मुबीन सयद गनी वय वर्ष ५१ व अजमोदिदन अब्दुल हमीद वय वर्ष ४० यांचेविरूध्द अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ व भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार फिर्याद दाखल केली आहे. अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.




