हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे करंजी शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील उसाचा फडाला आज दिनांक १६ रविवारी भर दुपारी शॉर्टसर्किट होऊन आग लागली (Five acres of sugarcane burnt due to short circuit at Karanji Shivara in Himayatnagar taluka). ऊस जळताना शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र काहीच फायदा झाला नाही. या घटनेत पाच एकरातील ऊस आगीच्या भक्षस्थानी सापडून शेतकऱ्याचे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.



याबाबत सविस्तर व्रत असे कि, हिमायतनगर तालुक्यात सध्या आगीच्या घटनेत शेतकऱ्यांच नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहे. असाच एक प्रकार रविवार दिनांक १६ रोजी भर दुपारी दोन वाजता करंजी शिवारात घडला असून, येथील शेतकऱ्याच्या शेतातुन गेलेल्या दोन तारामध्ये झालेल्या घर्षणाने शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडून आग लागली आहे. घटना लक्षात येताच आजूबाजूसह सर्वच शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र उन्हाळ्याचे दिवस आणि हवा असल्याने याचा काहीच फायदा झाला नाही. एकीकडे आज विझविताना दुसरीकडे वाऱ्याने आग भडकत गेली यात ऊस जळून खाक झाला आहे.



या दुर्घटनेत करंजी येथील शेतकरी रामराव पांडुरग सूर्यवंशी आणि श्याम कदम यां दोन शेतकऱ्यांच्या सर्वे नंबर 58/63/65 मधील अंदाजे पाच एकर ऊस जळुन खाक झाला आहे. या घटनेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामा करुन महावितरण विभागाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कारखान्याने ऊस नेण्याला विलंब केल्याने शेतकऱ्याला नुकसानीचा समान करावा लागला असल्याचे या भागातील शेतकरी बोलून दाखवित आहेत. तसेच हिमायतनगर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील अनेक वीजतारा ह्या जीर्ण झाल्या असून, याच्या दुरुस्तीकडे महावितरणचे संबंधित अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागून शेतकऱ्यांना याचा नाहक आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे.



