नांदेड| बाह्यस्रोत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण दि. २० फेब्रुवारी पासून जिल्हा परिषदेसमोर सुरु असून मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अद्याप उपोषणाची दखल घेतली नाही.


विविध एजन्सीज मार्फत प्रा.आ.कें. मध्ये ८८ युवक मागील ११ महिन्यापासून कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मुक्रमाबाद ता.मुखेड येथील ९ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विनायक कदम व सह सचिव राम कदम रा.मातुळ यांच्या नेतृत्वाखाली सदरील उपोषण सुरु आहे.

दोघा उपोषणार्थीची तब्येत खालवल्यामुळे सरकारी दवाखान्यात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे.
अडचणीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा देऊन उपोषण सोडविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

संबंधितानी दखल घेतली नाही किंवा कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविल्या नाही तर जिल्हा परिषदे समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सीटू चे जनरल सेक्रेटरी तथा युनियन अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिला आहे.
