Homeक्राईमSaponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने बेपत्ता अल्पवयीन मुलाचा...

Saponi Sanjay Nilpatrewar ; सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने बेपत्ता अल्पवयीन मुलाचा एका तासात लावला शोध

उस्माननगर l उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी सपोनि संजय निलपत्रेवार यांच्या तात्पर्यतेने आणि मार्गदर्शनाखाली उस्माननगर पोलिस कर्मचारी यांनी पोलिस स्टेशन हाद्दीतील हारवलेल्या अल्पवयीन मुलाला केवळ एका तासात शोधून सुखरूप रित्या वडीलांच्या स्वाधीन केले.

पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार
मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी मिशन निर्भया अंतर्गत बालक व महीला यांचे संदर्भाने प्राप्त तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे बाबत सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 12/11/2025 रोजी यातील फिर्यादी पुरूष यांनी पो.स्टे. ला हजर येवुन सांगतीले की, त्यांचा 15 वर्षाचा मुलगा हा रात्री पासुन घरून बेपत्ता झाला आहे. त्यावरून सपोनि श्री संजय निलपत्रेवार यांनी सदर पुरूष फिर्यादीकडे अपल्वयीन मुला बाबत चौकशी केली असता अल्पवयीन मुलाकडे मोबाईल असल्याबाबत माहिती मिळाली.

दर बाबीचे गांभिर्य लक्षात घेवुन मुलाकडे असलेल्या मोबाईल क्रमांकाचे तात्काळ सायबर शाखेकडून लोकेशन घेतले असता सदर मोबाईल नंबरचे लोकेशन हे चिखलवाडी नांदेड शहरात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने अल्पवयीन मुलाचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री संजय निलपत्रेवार यांनी तात्काळ पो.हे.कॉ./2232 मधुकर पवार, पो.कॉ./2748 पेदेवाड पो.स्टे. उस्माननगर यांना रवाना केले.

सदर पथकाने तांत्रीक मदतीच्या सहाय्याने एका तासातच अल्पवयीन मुलाचा शोध घेवुन मुलास चिखलवाडी नांदेड येथुन ताब्यात घेवुन पो.स्टे. हजर केले. व मुलास सुखरूप रित्या वडीलांचे ताब्यात देण्यात आले. सदरची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments