नांदेड

हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

मंगळवारी झाला मृग नक्षत्रातील पहिला दमदार पाऊस

सोनारी फाटा, शेख खय्युम। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा व पोटा परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या मृग नक्षत्रातील पहिल्याच दमदार पावसाने बळीराजाची प्रतीक्षा संपली असून, या पावसानंतर शेतात रेघाटया ओढून कापूस लागवडीला सुरुवात केली आहे. मात्र कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची बी-बियाणे, खत विक्रीत होणारी लूट थोडी वेदनादायक ठरत आहे.

हिमायतनगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे सोनारी फाटा व पोटा परिसरात नाल्यांना व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांनी १२ जून रोजी बुधवारी कापूस लागवड व पेरणीला प्रारंभ केला आहे. पावसासाठी वातावरण अनुकूल झाल्याचे भासत असल्याने मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेतकरी कापूस लागवड कामासाठी सज्ज झाला असून, सोनारी फाटा व पोटा परिसरामध्ये कापूस लागवडीला प्रारंभ झाले असल्याचे चित्र दिसत आहे.

IMG 20240613 WA0034 हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा परिसरात शेतकऱ्यांनी केली कापूस लागवडीला सुरुवात -NNL

११ जून रोजी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून, एक ते दीड तास सलग पडलेल्या पावसामुळे नाल्यांमध्ये व शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अचानक आलेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसामूळ अनेक नागरिकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली असून, अति जलद वेगाने वारे वाहू लागल्याने एकच धावपळ उडाली होती. एकूणच शेतकऱ्यांसाठी हा पाऊस पेरणीकरिता पाऊस योग्य नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास टाळाटाळ केली, परंतु काही शेतकऱ्यांनी परिसरात पावसावर कापूस लागवडिला प्रारंभ केला असल्याचे चित्र दिसत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!