उमरखेड, अरविंद ओझलवार। पर्यावरणाचा समतोल व रासायनिक खताचा जास्त वापर यामुळे जमिनीची पोत बिघडत असून त्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे .शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व सांगण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषी कन्यानी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बेलखेड येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे महत्त्व व फायदे तसेच माती परीक्षण कोणत्या योग्य पद्धतीने करावे व माती परीक्षणाचा किती पट फायदा होईल याबद्दल पुरेपूर अशी सर्व माहिती दिली.
मातीचे परीक्षण केल्यानंतर आपल्या शेतामधील मातीमध्ये कुठले पोषक द्रव्य किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यानुसार आपल्याला मातीमध्ये कमी असलेले पोषक द्रव्य खताद्वारे उपलब्ध करून देऊ शकते याचा नक्कीच उत्पादन वाढीस फायदा होईल असे मार्गदर्शन कृषी कन्यांनी केले .
मार्गदर्शनामुळे शेतकऱ्याचा मनात असलेला माती परीक्षणा बाबतचा संभ्रम दूर झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले . शेतकऱ्यांना मार्गदर्शन यावेळी कृषी महाविद्यालय उमरखेड येथील कृषीकन्या कु जान्हवी भंडारवार,कु.चंचल डोईफोडे, कु विद्या कदम,कु. कल्याणी कदम ,कु. ऐश्वर्या जाधव, देवी श्रीनीजा यांनी केले .
सदर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस के चिंतले व मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विषयाची प्राध्यापिका सौ. के. आर. सोळंके , श्री. ए. एस. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बेलखेड गावातील शेतकरी उपस्थित होते.