नांदेडमहाराष्ट्र

Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर – पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातुन विदर्भ ढाणकी गावाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले असून, अवघ्या महिन्यांत रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे महिन्याभरातच रस्ता खचून उखडला aslyane संबंधित ठेकेदाराने केलेल्या बोगस रस्ता कामाबद्दल नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

1008595811 Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर - पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

हिमायतनगर शहरातुन ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. रस्त्याचे काम औरंगाबाद येथील सिद्दीकी नामक ठेकेदास देण्यात आले होते संबंधित ठेकेदाराने अभियंत्याशी हातमिळवणी करून हिमायतनगर – पळसपूर – डोल्हारी पर्यंत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे. रस्त्याचे काम करताना अनेक नागरिक, शेतकऱ्यांनी रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. मात्र नागरिकांच्या तक्राराईला ना जुमानता ठेकेदारने मनमानी पद्धतीने थातुर माथूर रस्ता करून हिमायतनगर शहरानजीक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.

1008595781 Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर - पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

नुकताच झालेल्या डांबरी रस्ता कामास महिना उलटला नसताना हिमायतनगर पळसपूर डांबरीकरण रस्त्याची वाट लागली असल्याचे चित्र रस्त्यावर दिसून येत आहे. डांबरीकरण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, ट्रॅक्टर सारख्या वाहनाने ठीक ठिकाणी रस्ता खचला आहे. खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी पाहणी केली असता केवळ इंचभर डांबरीकरण केल्याचे दिसून येते आहे. गुत्तेदाराच्या केलेल्या या मनमानी कामाकडे संबंधित अभियंत्याने देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेतकरी, नागरिक, वाहनधारक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

1008595808 Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर - पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

हिमायतनगर ते पळसपूर या बोगस डांबरीकरण रस्ता कामाची प्रधानमंत्री ग्रामसडक रस्त्याच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी करावी. आणि दोषी गुत्तेदाराच्या एजन्सीचे नावं काळ्या यादीत टाकून हिमायतनगर शहरानजीक राहिलेल्या अर्धवट रस्त्यासह येथील नडव्याच्या पुलाचे काम चांगल्या गुत्तेदारा मार्फत पूर्ण द्यावे अशी मागणी केली जात आहे.

1008595778 Palaspur asphalt road work bogus : हिमायतनगर - पळसपुर डांबरी रस्त्याचे काम बोगस ; महिन्याभरातच रस्ता खचून उखडले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button