नांदेड l जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून किनवट, माहूर,. भोकर हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव बिलोली,देगलूर,मुखेड एकूण दहा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे.


10 तालुक्यातील सर्व गावात हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषध उपचाराचा डोस दिला जाणार आहे. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहिमेअंतर्गत डी ई सी व अलबेंडाझाल ही औषधे देण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेट देऊन वयोगटानुसार औषध देतील ही औषध रिकाम्या पोटी घेऊ नये, तसेच दोन वर्षाखालील मुले व गरोदर महिला, गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाही.

तरी 10 तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी, वीट भट्टी वरील कामगार,ऊसतोड व कामगार, दगड क्रेशर मशीन वरील कामगार अति जोखमेच्या भागातील नागरिकांनी हत्तीरोग विरोधी गोळ्यांचा डोस आरोग्य कर्मचाऱ्या समक्ष घ्यावा.असे आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

हत्तीरोग हा डासाच्या चाव्याने होणारा एक संसर्गजन्य रोग आहे या रोगाला लिम्फॅटिक फायलेरिसिस ( एल एफ ) असेही म्हणतात हत्तीरोगामुळे रुग्णाच्या पाय आणि वर्षणाचा आकार वाढतो हत्तीरोग झालेल्या रुग्णाच्या पायाला खूप जास्त सूज येते पायाचा आकार बदलतो आणि विद्रूप झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याला हालचाल करणे कठीण होते व दैनंदिन कामकाज करण्यास अडचणी येतात यासाठी आरोग्य कर्मचारी व आशा यांनी सामुदायिक औषधोपचार मोहिमेमध्ये याविषयी जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती करून नागरिकांनी आरोग्य सुधारण्यास मदत करावी असे आवहान डॉ.राजेश्वर माचेवार हिवताप व हत्तीरोग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला नियोजनबद्ध औषध उपचार देण्यात येणार आहे.