Dr. Sangeetha Deshmukh ; हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून
नांदेड l जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून किनवट, माहूर,. भोकर हदगाव, हिमायतनगर, कंधार, नायगाव बिलोली,देगलूर,मुखेड एकूण दहा तालुक्यात राबविण्यात येणार आहे. सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा स्तरावरून योग्य ते नियोजन करण्यात आलेले आहे.
10 तालुक्यातील सर्व गावात हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषध उपचाराचा डोस दिला जाणार आहे. हत्तीरोग दूरीकरण सार्वत्रिक औषध उपचार मोहिमेअंतर्गत डी ई सी व अलबेंडाझाल ही औषधे देण्यात येणार आहेत. आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेट देऊन वयोगटानुसार औषध देतील ही औषध रिकाम्या पोटी घेऊ नये, तसेच दोन वर्षाखालील मुले व गरोदर महिला, गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाही.
तरी 10 तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी, वीट भट्टी वरील कामगार,ऊसतोड व कामगार, दगड क्रेशर मशीन वरील कामगार अति जोखमेच्या भागातील नागरिकांनी हत्त...
