Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - महाराष्ट्र - Election announced : नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र नांदेड November 5, 2025

Election announced : नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

NNL TeamBy NNL TeamNovember 5, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

2 डिसेंबरला #मतदान तर 3 डिसेंबर रोजी #मतमोजणी

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम काल 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद देगलूर, नगरपरिषद भोकर, नगर परिषद धर्माबाद, नगरपरिषद किनवट, नगरपरिषद उमरी, नगरपरिषद हदगांव, नगरपरिषद मुखेड, नगरपरिषद कंधार, नगरपरिषद बिलोली, नगरपरिषद कुंडलवाडी, नगरपरिषद मुदखेड, नगरपरिषद लोहा, नगरपंचायत हिमायतनगर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या क्षेत्रात 1 लाख 47 हजार 165 पुरुष तर 1 लाख 50 हजार 858 स्त्री व इतर 20 असे एकूण 2 लाख 98 हजार 40 मतदार आपल्या मतदानाचा हक्क 351 संभाव्य मतदान केंद्रावर बजावतील.

12 नगरपरिषदांमध्ये नगरपरिषद देगलूर ही ब वर्गवारीची असून बाकी सर्व क वर्गवारीच्या नगरपरिषद व #नगरपंचायत आहेत. या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये एकूण प्रभाग संख्या 141 आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वाजेपर्यत राहील. या कालावधीत येणाऱ्या रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल.

मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

जातवैधता प्रमाणपत्राबाबत
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिण्याच्या आत शासनाच्या 3 नोव्हेंबर 2025 च्या अध्यादेशाद्वारे तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे तसेच उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांका पासून अधिनियमातील तरतुदीनुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल असे विहित केलेले हमीपत्र उमेदवारांने सादर करणे आवश्यक आहे.

नामनिर्देशनाबाबत – नामनिर्देशन स्विकारण्याची प्रक्रीया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत असल्याने नामनिर्देशन व शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअर द्वारेच भरणे आवश्यक आहे. निवडणूक लढवू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांनी https://mahasecelec.in संकेतस्थळावर स्वत: नोंदणी करावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्याची प्रिंट घेवून त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करावे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

#आचारसंहिता
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहील. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.

महत्वाच्या तारखा
* नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
* नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
* नामनिर्देशनपत्रांची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
* अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत – 21 नोव्हेंबर 2025
* अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
* मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
* मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025

Election program announced for 12 municipal councils and one municipal panchayat in Nanded district
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNagar Panchayat Election : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : ‘भावी’ंची सोशल मीडियावर चलती..!
Next Article Shiv Sena’s Mashal : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेची मशाल पुन्हा धगधगणार!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CIDCO Balaji Temple ; सिडको बालाजी मंदिर येथील वार्षिक ब्रम्होत्सव उत्सवाचे आयोजन

May 27, 2025

India Marathi Literary ; 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशनार्थ बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

February 18, 2025

encroachment removal campaign : शहर वाहतूक शाखा वजिराबाद व नांदेड वाघाळा महानगर पालीकेकडुण अतिक्रमण हटाव मोहीम -NNL

December 6, 2024

Elections : वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित

November 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bhiwandi Vilas Patil ; भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश- NNL

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश -NNL

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

Mla Baburao Kadam Kohalikar ; गोरलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळा व लमानी आई मंदिरास भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी घेतले दर्शन -NNL

The waterfall of Sahasrkund | रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंडचा धबधबा यंदा जुलै महिन्यात झाला प्रवाहित – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?