नवीन नांदेड l सिडको हडको परिसरातील भागात दोन दिवसांपासून झालेल्या संततधार व 28 ऑगस्ट रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको हडको परिसरासह विविध भागातील निवासस्थानी व सिडको भागातील एन.डी.42 भागातील जवळपास दोनशे घरात पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी घरातील पाणी काढले ,या परिसरातील मुख्य नाला व नालेसफाई न केल्याने, नव्याने मलसिरण लाईन तुंबलेल्या असल्याने पाणी घरात शिरले असल्याचा आरोप केला यावेळी शिवसेना आ.हेमंत पाटील, नांदेड दक्षिण आमदार आनंदराव पाटील बोढारकर व शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या सह भाजपा शहर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी पाहणी मनपा आयुक्त यांच्याशी संवाद साधला यावेळी लोकप्रतिनिधी अगोदर व मनपा अधिकारी नंतर आल्याचे पाहावयास मिळाले.


वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड दक्षिण महानगर यांच्या वतीने मनपा सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांनी केली आहे तर भाजपा महानगर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, विनोद कांचनगिरे, सुदर्शन कांचनगिरे,स़तोष कांचनगिरे, कविता चव्हाण,गजेवार यांनी पाहणी केली. सिडको हडको परिसरातील विविध भागात नव्याने झालेल्या वसाहती अंतर्गत मुख्य रस्ते नसल्याने व मलनिस्सारण लाईन तुंबलेल्या अवस्थेत असल्याने अनेक भागात दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी पहावयास मिळले.



अनेक भागातील नालेसफाई व मुख्य असलेला मोठा नाला पावसाळ्या पुर्वी नाले सफाई व अंतर्गत नाल्यावर केलेल्या अतिक्रमण यामुळे सिडको स्मशानभूमी लगत असलेल्या एन.डी.42 भागातील जवळपास दोनशे निवासस्थानी अनेक घरांत पाणी शिरल्याने जिवनाश्यक वस्तू सह पलंग,गादी,आदी वस्तू पाण्यानं वेढलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत, स्वतः आ.हेमंत पाटील, आ.आनंदराव बोढांरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे व भाजपा शहर उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे शिवसेना शहरप्रमुख तुलजेश यादव, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे,यांनी प्रत्येक निवासस्थानी जाऊन पाहणी केली यावेळी मनपा स्वच्छता विभागा कडुन नाले सफाई न झाल्याने व नाल्यावर अतिक्रमण यामुळे व मुख्य नाला सफाई न केल्याने तुंबलेल्या अवस्थे मुळे हे पाणी घरात शिरले असल्याचा आरोप महिला नागरीक यांनी केला, यावेळी आ.हेमंत पाटील यांनी मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्याशी संपर्क साधला सहाय्यक आयुक्त व स्वच्छता विभागाचे कोणीही आले नसल्याचे कळविल्या नंतर काही वेळाने अधिकारी आले.


तो पर्यंत स्वखर्चाने भाजपा उपाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांनी जेसीबी व्दारे नालेसफाई करण्यास सुरुवात करून पाण्याचा निपटारा केला.अखेर तब्बल आठ वाजता सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग,स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादेक,विभाग प्रमुख वसिम तडवी,स्वच्छता निरीक्षक रूपेश सरोदे यांच्या सह कर्मचारी आले यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी अधिकारी यांना फैलावर करून नागरी समस्या निवारण का होत नाही असा जाब विचारला.

लातूर फाटा ते सिडको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने काही काळासाठी वाहतूक बंद झाली तर मोढा मार्केट मधील विविध भागातील अनेक वसाहती अंतर्गत व कुसूमताई हायस्कूल, इंदिरा गांधी महाविद्यालय, शंकरनगर,यासह हडको,वाघाळा शाहुनगर,कौठा , वसरणी,असदवन, असरजन यासह विविध सखल भागात पाणीच पाणी साचलेले पहावयास मिळाले ,मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी तुंबलेल्या नाल्यातील कचरा रस्त्यावर विखुरलेला अवस्थेत पसरलेला होता.
जयहिंद पार्क शेषाद्री नगर येथील नाल्यातील पाईप मोठ्या पाण्याचा विसर्ग मुळे खचुन गेल्याने, आंबेडकर वादी मशिन मागील बाजूस असलेल्या वसाहती अंतर्गत पाणी साचल्याने नागरिकाची गैरसोय झाली आहे. वसरणी भागातील नदीकाठच्या किनाऱ्यावर असलेल्या अनेक भागात गोदावरी नदी आलेल्या शंकरनगर, हर्ष ,एकता नगर भागातील पाणीच पाणी झाल्याने निवासस्थानी अडकलेल्या 19 जणांची मनपा अग्नीशामक दल अधिकारी दासरे यांच्या पथकाने सुटका केली.
तुंबलेल्या भागात मनपाचे सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी यांनी जे.सी.बी व्दारे पाण्याचा निपटारा केला, क्रांती चौक भागातील दर्डा किराणा दुकानात पाण्याचा प्रवाह आल्याने मोठ्या प्रमाणात बिस्किटे, चॉकलेट,साबन व किराणा दुकानातील ईतर असे जवळजवळ तीन लाख रुपये नुकसान झाले आहे.
महसूल प्रशासनाच्या वतीने नांदेड उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, नांदेड तहसीलदार संजय वारकड,नायब तहसीलदार नागमनवाड,मंडळ अधिकारी जौधंळे,वाघाळा तलाठी सज्जा एस.ए.वानोळे यांनी पाणी शिरलेल्या निवासस्थानी जाऊन जवळपास पन्नास प्राथमिक पंचनामा करून मनपा प्रशासन यांना कळविले आहे.
संततधार पावसामुळे मात्र मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या सिडको हडको भागासह अनेक भागात पाणीच पाणी पहावयास मिळाले. जुना कौठा भागातील राणा कॉर्नर भागातील चार ते पाच निवासस्थानी पाणी शिरल्याने जिवनाश्यक वस्तू नुकसान झाले आहे माजी नगरसेवक राजू पाटील काळे यांनी मनपा प्रशासनाशी संपर्क साधुन स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा केला


