कहाळा l विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने गेल्यामुळेच आमचे भले होऊ शकते असा संदेश साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अखेरच्या काळात दिला असून आपण सर्वांनी त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते इंजि. देगलूरकर यांनी दिला.


सुगाव ता. लोहा जि. नांदेड येथे आयोजित डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. गावातील ज्येष्ठ नागरिक बालाजी पांडुरंग चिंचाळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.


आपल्या प्रबोधनपर भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांची सुरुवात साम्यवादी विचारांनी झाली असली तरी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते आंबेडकरवादाकडे वळले होते, म्हणून त्यांनी “जग बदल घालून घाव, सांगूनी गेले मला भीमराव !” हा अत्यंत मोलाचा संदेश दिला आहे. यानुसार गुलामगिरीची विषमतावादी व्यवस्था बदलण्यासाठी आपणाला काम करावे लागणार आहे. या व्यवस्थेवर घणाघाती घाव घालण्यासाठीच हा जयंती महोत्सव आहे, असे मी समजतो.


याप्रसंगी काॅ. दिगांबर घायाळे, प्रा. इरवंत सुर्यकार, जि. प. सदस्य प्रतिनिधी सुभाष गायकवाड, विठ्ठलराव पुणेबोईनवाड, बालवक्ते किर्तीराज शिरसे, साधना गायकवाड, गौरव वाघमारे, धनश्री गायकवाड, प्रतिभा शिरसे, विशाखा गायकवाड यांनीही आपले विचार मांडले.

प्रारंभी सरपंच विमलबाई कांशीराम गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी रामदास पा. जाधव, गणेश पा. जाधव, अनिता गायकवाड, देविदास शिरसे, शामराव पा. जाधव, आनंद पा. जाधव, प्रल्हाद पा. जाधव, विश्वंभर धंदे, बालाजी पा. जाधव, परमेश्वर चिंचाळे, शामराव धंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भगवान शिरसे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे पदाधिकारी गोविंद गायकवाड, शिवाजी गायकवाड, अभिजित गायकवाड, संभाजी गायकवाड, माधव गायकवाड, दिपक गायकवाड, सिद्धेश्वर गायकवाड, शंकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रशांत नव्हारे, अर्जुन कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

