Eng. Degalurkar ; डाॅ. आंबेडकरांच्या मार्गानेच आमचे भले होऊ शकते असा संदेश अण्णाभाऊंनी दिला – इंजि. देगलूरकर
कहाळा l विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने गेल्यामुळेच आमचे भले होऊ शकते असा संदेश साहित्य सम्राट डाॅ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या अखेरच्या काळात दिला असून आपण सर्वांनी त्याच मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते इंजि. देगलूरकर यांनी दिला.
सुगाव ता. लोहा जि. नांदेड येथे आयोजित डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. गावातील ज्येष्ठ नागरिक बालाजी पांडुरंग चिंचाळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या प्रबोधनपर भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांची सुरुवात साम्यवादी विचारांनी झाली असली तरी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते आंबेडकरवादाकडे वळले होते, म्हण...
