नांदेडलाइफस्टाइल

Houses collapse : मुसळधार पावसामुळे वारंगटाकळी येथे घरांची पडझड; घरगुती साहित्यांचे नुकसान

हिमायतनगर| गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. वारंगटाकळी गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांना तडे गेले असून, एका शेतकऱ्याचे राहते घर कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पावसामुळे घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले असून पावसाळ्यात कुटुंबांना इतरत्र आसरा घ्यावा लागत आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शेतकरी केशव कदम यांचे घर रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे अचानक कोसळले. घरातील साहित्य पाण्याखाली गेले असून, कुटुंबीयांना तातडीने घराबाहेर पडावे लागल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

IMG 20250901 WA0015 Houses collapse : मुसळधार पावसामुळे वारंगटाकळी येथे घरांची पडझड; घरगुती साहित्यांचे नुकसान

वारंगटाकळी व परिसरातील अनेक कच्ची घरे पडझड झालेली असून काही घरांना तडे गेले आहेत. तरीही महसूल प्रशासनाने पंचनामे सुरू केले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावचे पोलीस पाटील अवधूत राव कदम, सरपंच दयाळ गिरीगिरी, सदस्य दत्ता पुपलवाड व ग्रामस्थांनी एकमुखाने मागणी केली की, “प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.”

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!