नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26 चे आयोजन दि. 03 ते 04 डिसेंबर 2025 दरम्यान नांदेड येथे करण्यात येणार आहे.


युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या पत्रानुसार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD (Viksit Bharat–Young Leaders Development) मध्ये करण्यात आले असून हा उपक्रम विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी जोडण्यात आला आहे. याअंतर्गत NYK–VBYLD–2026 चे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन दिल्ली येथे होणार आहे. यात 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग असणार आहे.


राष्ट्रीय स्तरावर चार प्रमुख मार्गांतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जातील — Cultural and Innovation Track, Viksit Bharat Challenge Track, Design for Bharat, Hack for Social Cause, या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात Cultural and Innovation Track अंतर्गत विविध सांस्कृतिक आणि कलाविषयक स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. यात समाविष्ट कलाप्रकार असे — समूह लोकनृत्य (10 सहभागी), लोकगीत (10 सहभागी), कथालेखन (3 सहभागी), चित्रकला (2 सहभागी), वक्तृत्व स्पर्धा – इंग्रजी/हिंदी (2 सहभागी), कविता लेखन – 500 शब्द मर्यादा (3 सहभागी) एकूण 30 स्पर्धकांना प्रवेश मिळणार असून स्पर्धांसाठी 15 ते 29 वयोगटाची अट राहणार आहे. (दि. 12 जानेवारी 2026 रोजी वयाची गणना लागू)


युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना आपले कलागुण प्रदर्शित करण्यासाठी एक खुले व्यासपीठ मिळणार असून सांस्कृतिक जतन, राष्ट्रीय एकात्मता, विज्ञान–तंत्रज्ञानातील नवसंकल्पना, शिक्षण-उद्योग-शेती क्षेत्रांची माहिती व सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

पात्रता: महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या आणि 15–29 वयोगटातील युवक-युवतींना सहभागाची संधी आहे. जिल्ह्यातील कृषी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, ITI, कनिष्ठ-वरिष्ठ महाविद्यालये, शाळा, महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था, NSS, नेहरू युवा केंद्र आदी संस्थांतील युवक सहभागी होऊ शकतात. प्रत्येक कलाप्रकारातील विजेत्यांना रोख पारितोषिक व आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील विजयी स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुकांनी आपली नावे/प्रवेशिका दि. 02 डिसेंबर 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्टेडियम परिसर, नांदेड येथे सादर कराव्यात. अधिक माहितीसाठी संपर्क: श्री. बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक) – 9850522141 / 7517536227 असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.


