नांदेड। डॉ. बी. आर. आंबेडकर फाउंडेशनच्यावतीने दिला जाणारा कृष्णाई 2024 पुरस्कार दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक प्रा.अभयकुमार दांडगे यांना प्रदान करण्यात आला.


पुरस्कार, मानपत्र, 10 हजार रूपयांचा धनादेश, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा.प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. भीमराव केराम यांच्या हस्ते दांडगे यांना सन्मानित करण्यात आले.


यावेळी भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पय्या बोधी थेरो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे व आमदार भीमराव केराम, पीआरपीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, संस्थापक अध्यक्ष तथा पीआरपीचे प्रदेश महासचिव बापूराव (बापूसाहेब) गजभारे, स्वागत अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे, संयोजक आकाश गजभारे, विनोद भरणे, संघरत्न खंदारे, सतीश बनसोडे, साहेबराव सोनकांबळे, सतीश पांडवे, बी एल वाघमारे, कुलदीप चिकटे, प्रा. नमिता चव्हाण, राजेश चव्हाण यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.




