HomeनांदेडDemond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती...

Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार। ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैगींक अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी. आणि हिमायतनगर शहरातील नामांकित हुतात्मा जयवंतराव पाटील कॉलेज, शाळा, राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रेल्वे स्टेशन, परमेश्वर मंदिर परिसर व गणेश मंदिर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देऊन मुलींच्या मानव विकास मिशन बसमागे मोटार सायकल घेऊन फिरणाऱ्या रोड रोमीयांचा बंदोबस्त करून महिला मुलींच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे हिमायतनगर शहर व तालुक्यातील पालक वर्गाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे या ठिकाणावर असलेल्या शाळा महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्ग तसेच जागृत मंदिरात दर्शनासाठी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महिला मुलींची येजा होत असते. मात्र हवा त्या प्रमाणात मंदिर, शाळा कॉलेज परिसरात पोलिसांचा बंदोबस्त नसल्याने टवाळखोऱ्याचे प्रकार वाढले आहे. शहरांमध्ये धूम स्टाईल गाड्या पळवून कट मारणारे, हातवारे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकारावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे . नुकतीच घडलेल्या बदलापूर येथील घटनेवरून आज हिमायतनगर तहसीलदार यांच्यामार्फत पालक वर्गाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ठाणे जिल्ह्यातील बदलापुर येथील आदर्श विद्या मंदिर मध्ये चार वर्षाच्या चिमुरडीवर तेथील सफाई कर्मचाऱ्याने लैंगीक अत्याचार केलेली घटना काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे, या घटनेवरून महाराष्ट्रामध्ये मुलींच्या सुरक्षेमध्ये आपण कुठ कमी पडतोय…? हा प्रश्न इथल्या प्रत्येक आई वडीलांना पडत आहे.

IMG 20240822 WA0038 Demond for police girls give police protection ; बदलापूर सारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शाळा, कॉलेज, क्लासेस, मंदिर, रेल्वे बसस्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची मागणी -NNL

तसेच लातुर जिल्ह्यातील चाकुर येथे साडे चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली व अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मध्ये इयत्ता 8 वी मध्ये शिकणाऱ्या विद्याथींनीना अश्लिल व्हिडीओ दाखवत लैंगीक अत्याचार करण्यांचा प्रयत्न झाला असुन, तेथील शिक्षक प्रमोद सरदार यांच्यावर आणि वरील सर्व घटनामधील आरोपीवर फास्टट्रेक कोर्टात प्रकरण चालवून कठोरात कठोर शिक्षा देण्यांत यावी. बदलापूर येथील 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैगींक अत्याचार केलेल्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यांत यावी. अशी मागणी करत जागरूक पालकानी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

यापुढे असले कृत्य करतांना आरोपीच्या मनात भिती निर्माण झाली पाहिजे यासाठी कठोर पावले उचलावी. हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर परिसर, महाविद्यालय परिसर, प्रमुख मंदिरे व रेल्वे स्थानक रस्त्यावर मुलीच्या सरंक्षणासाठी पोलीस सुरक्षा तैनात करण्यांत यावी. कारण वरील घटनेची पुनरावृत्ती हिमायतनगर शहरात होवु नये याकरीता आपल्या पोलीस प्रशासनाकडुन महाविद्यालय / शाळा व मंदिर परिसर व बस स्टॅन्ड परिसरात शाळेच्या वेळेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यांत यावा. आणि शहर व तालुक्यात टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोराना अद्दल घडविण्यासाठी योग्य ते शासन करावे असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे, या निवेदनाची प्रत हिमायतनगर येथील तहसीलदार पल्लवी टेमकर आणि पोलीस निरीक्षक अमोल भगत यांना देखील देण्यात आली आहे. या निवेदनावर हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील जागरूक पालक वर्गांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments