Green signal : वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) मधील वनजमिनीतील दर्गा,मंदिर तिर्थक्षेत्र व वनौद्यानाला हिरवा कंदिल !
हिमायतनगर/नांदेड| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधी मिळण्यासाठी वाळकेवाडी- दुधड-सोनारी-पोटा (बु.) च्या वनजमिनीतील दर्गा व मंदिरांना तिर्थक्षेत्र /तिर्थस्थळ तसेच,वन पर्यटनासाठी प्रशासनाकडून सकारात्मक भूमीका घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी आज दि.१८ ऑगस्ट रोजी भरपावसात सोनारीफाटा येथे सुरु केलेले आमरण उपोषण तुर्त स्थगित केले.
सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री.सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पो...


