नांदेड l नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात व साथरोग गावात डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी स्वतःभेटीचा धडाका लावला आहे.


यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण मिळण्यासाठी मदत होत असून संपूर्ण पुरग्रस्त गावांमध्ये मॅलेथॉन पावडर व बीटिआय पावडर फवारणी होत असुन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी कर्मचारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा काम करीत असून जनतेला आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण देण्याच्या सूचना डॉ संगीता देशमुख मॅडम जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांनी दिल्या आहेत. त्या स्वतः नियमित ग्रामीण भागात दौरे करीत असल्याने कर्मचारी व जनतेने मागच्या अनेक वर्षात असा जिल्हा आरोग्य अधिकारी पाहिला नाही अशी चर्चा करीत आहेत.



आज दि. 6 सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वडगाव खुर्द ता हिमायतनगर येथे भेट देऊन ताप रूग्णांची भेट घेऊन गावात कंटेनर सर्वे, ताप रूग्ण सर्व्हेक्षण, धुरफवारणी अळीनाशक औषधी फवारणी, सिरम सॅंपल, रक्त नमुने इत्यादी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात व गावामध्ये वैद्यकीय पथक तैनात करून पाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सुचना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या सोबत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.




