उमरी l ” कुष्ठरोग शोध व सर्वेक्षण मोहिमे ” अंतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी मंगळवार, दि. १८ रोजी उमरी तालुक्यातील सिंधी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या इज्जतगाव येथे अचानक भेट दिली.


डॉ. देशमुख यांनी कुष्ठरोग शोध मोहिमेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांकडून घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या तपासणीच्या पद्धतीची माहिती घेतली.


भेटीतील महत्त्वाचे मुद्दे :-
-: जनजागृतीवर भर : डॉ. देशमुख यांनी कुष्ठरोग शोध मोहिमे दरम्यान गावकऱ्यांमध्ये कुष्ठरोगाविषयीची भीती दूर करणे आणि रोगाची लवकर ओळख करून उपचारासाठी प्रोत्साहित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.


– प्रोत्साहन व मार्गदर्शन : त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांना नागरिकांशी अधिक संवाद साधून शंकेचे निरसन करण्याचे तसेच दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचे निर्देश दिले.

– – लक्षवेधी तपासणी: कुष्ठरोगाची लक्षणे आढळणाऱ्या प्रत्येक संशयित रुग्णाची योग्य तपासणी करून तातडीने उपचार सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. कुटुंब नियोजन पंधरवड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाचीही यावेळी माहिती घेण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख यांच्या या भेटीमुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले असून, कुष्ठरोग निर्मूलनाच्या कामाला अधिक गती मिळणार आहे.या मोहिमेचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी कोणताही चट्टा असेल दाखवून घ्यावे असे आवाहन डॉ संगिता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे


