Homeनांदेडexpenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11,...

expenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी -NNL

नांदेड| विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 87-नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांची खर्च निरीक्षक यांच्या समोर निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी गुरुवार 7 नोव्हेंबरला, द्वितीय तपासणी 11 नोव्हेंबरला तर तृतीय तपासणी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ चिखलवाडी नांदेड येथे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार ही तपासणी होईल. या तपासणीसाठी उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाचा हिशोब खर्च निरीक्षक यांच्यासमोर सादर करणे आवश्यक आहे.

अनुपस्थित राहणारे उमेदवार भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकांनुसार कार्यवाहीस पात्र असतील. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवणे व दाखल करण्याच्या कायद्याच्या आवश्यकतांचे अनुपालन करण्यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने कसूर केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 10 क अन्वये तो निवडणूक आयोगाकडून तीन वर्षाच्या कालावधीसाठी निरर्ह ठरविण्यास पात्र असेल, याची नोंद घ्यावी.

लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 77 नुसार निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक उमेदवार एकतर तो स्वतः /ती स्वतः किंवा त्याच्या / तिच्या निवडणूक प्रतिनिधीद्वारे त्यांला / तिला नामनिर्देशित करण्यात आले आहे, त्या दिनांकापासून निवडणुकीचा निकाल लागण्याच्या दिनांकापर्यंत दोन्ही दिनांक धरून, त्याने किंवा त्याच्या निवडणूक प्रतिनिधीने केलेला किंवा प्राधिकृत केलेल्या सर्व खर्चाचा स्वतंत्र व अचूक हिशेब ठेवणे आवश्यक आहे, असे असे निवडणूक निर्णय अधिकारी 87-नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments