Umri ; कुष्ठरोग शोध मोहिमेला उमरी तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट
उमरी l " कुष्ठरोग शोध व सर्वेक्षण मोहिमे " अंतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी मंगळवार, दि. १८ रोजी उमरी तालुक्यातील सिंधी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या इज्जतगाव येथे अचानक भेट दिली.
डॉ. देशमुख यांनी कुष्ठरोग शोध मोहिमेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविकांकडून घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या तपासणीच्या पद्धतीची माहिती घेतली.
भेटीतील महत्त्वाचे मुद्दे :-
-: जनजागृतीवर भर : डॉ. देशमुख यांनी कुष्ठरोग शोध मोहिमे दरम्यान गावकऱ्यांमध्ये कुष्ठरोगाविषयीची भीती दूर करणे आणि रोगाची लवकर ओळख करून उपचारासाठी प्रोत्साहित करण्याच्या महत्त्वावर भर दिला.
- प्रोत्साहन व मार्गदर्शन : त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे ...
