देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील मौ तमलुर येथील ग्रामविकास अधिकारी याच्या मनमानी कारभाराची चौकशी करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शिवराज हाडे यांनी मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मेघना कावली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


तमलुर येथील ग्रामपंचायत तेरा सदस्यांची असून, ग्रामविकास अधिकारी गावात फक्त मासिक बैठकीसाठी उपस्थित राहतात. बाकीचे दिवस उंटावर बसून शेळया हाकलण्याच्या प्रकारा सारखे तालुक्याच्या ठिकाणाहून कारोभार पाहतात. ग्रामविकास अधिकारी मासिक बैठकीसाठी आले असता पहिल्या प्रथम कोणत्याही प्रकारची कार्यलीन प्रकिया पूर्ण न करताच ग्रामपंचायत सदस्याचे सहा घेतात.


जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांनी आपापल्या प्रभागातील समस्या व गावातील समस्या विकासाबाबत चर्चा केली असता टीपन घेत नाहीत. तसेच सदस्यांनी सुचवलेले विषय प्रोसेडीग मध्ये लिहित नाहीत. प्रोसेडीग सदस्यांना दाखवत नसून सदस्यांना दमदाटी करून खोटे ठराव घेऊन कामे उरकून टाकतात.


ग्रामविकास अधिकारी हे फक्त सरपंचाच्या हितासाठी काम करतात. ग्रामविकास अधिकारी व सरपाचाचा मुलगा मिळुन ग्रामपंचायत सदस्यांना न जुमानता गावचा कारोभार परस्पर मनमानी पणे करतात. जनतेनी निवडून दिलेल्या सदस्यांचा अवमान करून घटनेने दिलेले अधिकार हिरावून घेणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून तत्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे. असे शिवराज हाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड याना दिलेल्या निवेदनात नमूद केले.



